Prakash Ambedkar : जरांगे पाटलांसारखं नेतृत्व पुढं येत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar : भाजपचा अजेंडा आहे की, आम्हाला संविधान बदलायचं आहे. संविधान वाचलं तर आरक्षण वाचेल, संविधान नाही वाचलं तर आरक्षण कसं वाचेल? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड येथील ओबीसी मेळाव्यात केला.

आपल्याला मिळालेलं आरक्षण टिकवायचं आहे. मोर्चे काढून, आंदोलने करून जागृती होते. पण मिळालेलं टिकवायचं असेल तर सत्तेत गेलं पाहिजे. ओबीसींच्या हातात सत्ता आली पाहिजे त्यासाठी कबाब, शबाब आणि महात्मा गांधी( पैसे) यांचा त्याग केला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Sansad Ratna Award : खासदार श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर, १७ व्या लोकसभेतील कामगिरीचा गौरव

शासनाला कोणाला जात देता येत नाही, आस्तित्वात असणारी जात मागासवर्गीय आहे का नाही ? एवढंच सांगण्याचा अधिकार त्यांना असतो. नव्या जातीला जन्म देणं हा शासनाचा अधिकार नाही आणि तो अधिकार संविधानाने त्यांना दिला नाही असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली. 

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यावर भाष्य करताना ते म्हटले की, सडलेले नेतृत्व त्यांच्या समाजालाही न्याय देत नाही आणि आपल्यालाही न्याय देत नाही. जर, जरांगे पाटलांसारखं नेतृत्व पुढं येत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण, आमच्या ताटात येऊ नको, वेगळं ताट पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला मदत करतो, असं त्यांना सांगितलं पाहिजे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाची ताट जर वेगळी राहिली तर, या महाराष्ट्रात बदल घडू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर ही निशाणा साधला. मी दोन-तीन वेळा मोहन भागवतांची भेट मागितली होती, पण झाली नाही. या संविधानात काय वाईट आहे ते सांगा ? असं मी त्यांना विचारणार होतो. तुमचं पटलं तर तुमच्यासोबत येतो आणि नाही पटलं तर आमच्यासोबत या, असं मी त्यांना सांगणार होतो, असं ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply