Prakash Ambedkar : मनोज जरांगेंना आव्हान देण्याची काय गरज होती ? प्रकाश आंबेडकरांची भुजबळांवर टीका

Prakash Ambedkar : आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर  यांनी केला आहे. छगन भुजबळांनी जालन्यातील ओबीसी मेळाव्याच्या  ठिकाणाहून मनोज जरांगेंना आव्हान देण्याची गरज काय होती असा सवालही त्यांनी विचारला. 

Lalit Patil : ललित पाटील प्रकरणी 2 पोलिसांना अटक, कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल कारवाई

आज अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रकाश आंबेडकर, प्रा. अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आंबेडकरांनी आजच्या अंबडमधील ओबीसी एल्गार सभेवर टीका केली. या सभेत बोलताना युवानेते सुजात आंबेडकरांनी आरक्षणासोबतच शेतमालाला भाव आणि ओबीसी जनगणनेचा प्रश्न महत्वाचा असल्याचं म्हटलंय. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply