Pradeep Sharma Bail: सर्वात मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर

Pradeep Sharma Granted Bail: एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि माजी वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. अँटालिया स्फोटकं प्रकरणात त्यांना अटक झाली होती. तेव्हापासून प्रदीप शर्मा जेलमध्ये होते. आता सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. 

अँटालिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा आरोपी आहे. २०२१ मध्ये प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरूंगात होते. याआधी हायकोर्टाने त्याचा जामीन फेटाळला होता. मात्र, शर्मा यांच्याकडून पुन्हा जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता.

गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतली होती. सुनावणीनंतर कोर्टाने या संदर्भातला निकाल राखून ठेवला होता. आज म्हणजेच मंगळवारी कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे प्रदीप शर्मा हे लवकरच तुरूंगाबाहेर येण्याची शक्यता आहे.

Pune Crime : 'इथं गुन्हेगारी चालते...' रील बनवणाऱ्या भाईला पोलिसांचा हिसका, हडपसरचा बादशहा थेट गुडघ्यावर आला

२५ फेब्रुवारी २०२१ या दिवशी उद्योगपती मुकेश अंबानींचं निवासस्थान असलेल्या अँटालिया या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. या घटनेनंतर स्कॉर्पिओ मालक मनसूख हिरेन याचा मृतदेह ठाण्याजवळ खाडीत आढळला होता.

एप्रिल २०२१ मध्ये हा तपास एनआयएने ताब्यात घेतल्यावर तत्कालीन एपीआय सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रदीप शर्मांसह 9 जणांना एनआयएने अटक केली. प्रदीप शर्मांनी वाझेला पुरावे मिटवायला मदत केली असा ठपका आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply