Politics : ठिकाण ठरलं! पुण्यात होणार वज्रमूठ सभा, या दिग्गज नेत्याकडे जबाबदारी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर अनेक मोठ मोठ्या घडामोडी घडल्या. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारला शह देण्यासाठी महाविकास आघाडीने विविध भागात वज्रमुठ सभेचे आयोजन केले आहे.

त्यानुसार पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली या सभेला तिन्ही पक्षाचे प्रचंड कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर दुसरी सभा नागपूरला पार पडणार आहे. या सभेचे नियोजन काँग्रेस आणि मित्र पक्ष पाहणार आहेत.

तर मे महिन्यात पुण्यात ही सभा होत आहे. या सभेची जबाबदारी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या सभेसाठी शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने पुणे शहरातील नेत्यांची बैठक पार पडली.

या बैठकीत सभेसंदर्भात अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले. पुण्यात होणाऱ्या वज्रमुठ सभेचे ठिकाण ठरलं असून शहरातील नाना पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. ही सभा 14 मे 2023 रोजी रविवारी होणार आहे. तर या सभेसाठी मविआ मधील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या सभेवरून अनेक तर्क वितर्क लढवण्यात आले. कारण या सभेचे नियोजन उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे होते. यासभेत लावण्यात आलेले बॅनर आणि सभेच्या स्टेजवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी ठेवण्यात आलेली वेगळी खुर्ची त्यामुळे चर्चांना उधान आलं होत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply