Political News : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लान; महाराष्ट्रात १ कोटी अँबेसेडर नेमणार, नेमकं कशासाठी?

Political News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मास्टर प्लान तयार केला आहे. भाजप लवकरच महाराष्ट्रात १ कोटी अँबेसेडर नेमणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या अँबेसेडरच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवल्या जाणार आहे. निवडणुकीपूर्वी सरकारची कामं जनतेपर्यंत जावीत, असा यामागचा हेतू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

नुकत्याच ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये ३ राज्यांमध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली. उर्वरित दोन राज्यांत भाजपचा फारसा प्रभाव नव्हता. मात्र, तरी देखील या राज्यांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली. 

Hit And Run New Law : ट्रक चालकांचा नव्या कायद्याला विरोध; नागपूर- भंडारा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलनास प्रारंभ

विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्र्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवलं होतं. आता आता लोकसभेसाठी भाजप हीच रणनिती आखणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यातील पहिला प्लान म्हणजेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवल्या जाणार आहे.

यासाठी महाराष्ट्रात  १ कोटी अँबेसेडर नेमले जाणार आहेत. या अँबेसेडरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात विकासकामे आणि विकास योजनांची माहिती दिली जाणार आहे. याबाबतची माहिती भाजपाच्या नमो ॲप अभियानाचे राष्ट्रीय संयोजक कुलजीत सिंग चहल यांनी दिली आहे.

मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी कल्याणकारी योजनांचा लाभ समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य हे अँबेसेडर करणार असल्याचं चहल यांनी सांगितलं. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता असे कमीत कमी १० अँबेसेडर तयार करेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुण्याच्या भोर तालुक्यात भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडली. भाजप नेते तसेच पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती होती. याबैठकीत लोकसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व निवडणूका ताकदीने लढविण्यासाठी तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply