Political News : "आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाणार, त्यांचा पासपोर्ट जप्त करा", भाजप नेत्याचं खळबळजनक विधान

Political News : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात एसआयटी गठित करण्यात आली आहे. यामझ्ये तीन अधिकाऱ्यांचा तपास अधिकारी म्हणून समावेश करण्यात आला आहे. दरम्यान शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाणार आहेत. त्यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस काढावी किंवा त्यांचा पासपोर्ट जप्त करावा अशी मागणी भाजपचे नेते नितेश राणे यांनी केली आहे.

या प्रकरणातील आरोपी आदित्य ठाकरे परदेशात पळून जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात लूक आउट नोटीस जाहीर करून त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना केली.

Vijay Wadettiwar : समृद्धी महामार्गावरील मृतांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत द्या; विजय वडेट्टीवर यांची मागणी

राणे म्हणाले की, सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीतून सगळी सत्यता बाहेर येईल. आपला मुलगा आरोपी असल्याने उद्धव ठाकरे त्यांचा बचाव करीत आहेत. दिशा सालियान आणि सुशांतसिंग राजपूत यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

मला विश्वास आहे जे आरोपी आहेत, जे सहानुभूती मिळवत आहेत सर्व आरोपी पकडले जातील आणि त्यांना शिक्षा मिळेल. सरकारकडे एक मागणी करेल आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाणार आहे. त्याच्या विरोधात लुक आऊट नोटीस काढावी किंवा पासपोर्ट जप्त करावा असेही ते म्हणाले.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपपत्र देण्यास विरोध आहे. ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांनाच देण्यात यावे. रोहित पवार यांच्या मोर्चावर झालेला लाठीमार नियोजित होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘संजय राऊत यांचे बंधू मशाल चिन्हावर लढण्यास तयार नाही. त्यांच्या घरी यावरूनच वाद सुरू आहे. त्यांच्यापैकी कोण कुठून लढेल हा निर्णय राऊतांनी आधी करावा’, असेही राणे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply