Political News : काँग्रेस पक्षाला हिंदू समाज त्यांची जागा दाखवणार; राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवर भगवंत खूबा यांचं टीकास्त्र

Political News : भारत जोडो यात्रेनंतर आता राहुल गांधी यांनी भारत न्याय यात्रा सुरू केली आहे. या यात्रेवर आता भाजपकडून टीका करण्यात येत आहे.केंद्रीय राज्य मंत्री भगवंत खूबा यांनी देखील या यात्रेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केलीय.

"देश तोडो यात्रा चालू झाली असून 2014 पेक्षा ही 2024 मध्ये त्यांच्या लोकसभेच्या जागा कमी येतील, यात्रा काढून काही फरक पडणार नाही. राहुल गांधी यांचे व्यक्तीमहत्व प्रभावशाली नाही. काँग्रेस पक्ष हा अल्पसंख्याकांवर राजकारण करत आहे, अशी टीका भगवंत खूबा यांनी केली आहे.

Pune Police Transfer : ऐन निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, आयुक्तांचे रात्री उशिरा आदेश

पुढे भगवंत खूबा यांनी म्हटलं की, 22 जानेवारीला राम मंदिराचे आमंत्रण असले तरी काँग्रेस पक्षाने राम मंदिराचे आमंत्रण नाकारले. याचा अर्थ ते नेहरू, इंदिरा गांधी,राजीव गांधी,सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी हे हिंदू विरोधी आहेत. येणाऱ्या लोकसभेत काँग्रेस पक्षाला हिंदू समाज त्यांची जागा दाखवणार, अशा शब्दांत काँग्रेसवर टीकास्त्र सोडलंय.

केंद्रीय राज्य मंत्री भगवंत खुबा नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. कर्नाटक राज्यात लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत. मागच्या वेळेस 28 पैकी 27 जागा भाजपाने जिंकल्या होत्या.आता यावेळेस 28 पैकी 28 जागा भाजपा आणि JDS पार्टीचे उमेदवार जिंकणार असा विश्वास देखील भगवंत खूबा यांनी व्यक्त केला.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply