Police suspended : थर्टी फस्टची ड्युटी सोडून मारली दांडी; कर्तव्यात कसूर करणारे सात पोलीस कर्मचारी निलंबित

Police suspended : नववर्षाच्या सुरवातीलाच कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या सात कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी कारवाईचा बडगा उगारत दणका दिला आहे.

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरासह जिल्हाभरामध्ये पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अधिकाऱ्यांना दिले होते, या बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे संपूर्ण जिल्हाभरात कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. त्यानुसार नेमलेली ड्युटी सोडून मोबाईल स्विच ऑफ करत सात पोलीस कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. 

Follow us -

Political News : "वंचित आणि ठाकरे गटाच्या 12-12 फॉर्मुल्याचे आम्ही बारा वाजवू"

दांडी मारणाऱ्या या सात पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी निलंबनाची कारवाई करत कारवाईचा बडगा उगारल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी; या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षकांतर्फे सांगण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply