Police Recruitment 2024 : तरुणांसाठी खूशखबर! पोलीस भरती प्रक्रिया आजपासून सुरु; कुठे आणि कसा कराल अर्ज?

Police Recruitment 2024 : राज्यात काही महिन्यांपूर्वी १७ हजार पोलीस शिपायांची भरती होणार असल्याची घोषणा झाली होती. परंतु भरती प्रक्रिया जाहीर होत नव्हती. त्यामुळं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांची धाकधुक वाढली होती. अखेर सरकारनं भरती जाहीर केली आहे. राज्यभरात पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. 

ऑनलाईन पद्धतीनं या पोलीस भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावं लागणार आहे. 31 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. यापूर्वी आपल्याला अर्ज प्रक्रिया करावी लागणार  आहे. पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई आणि कारागृह कॉन्स्टेबल अशा पदांसाठी भरती होत आहे.

Dharashiv Crime News : धाराशिव पोलिसांची कामगिरी, घरफोडीतील एकासह सात जण अटकेत

पोलीस भरती सुरू

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात रिक्त ११८, नाशिक ग्रामीण पोलीस दलात ३२ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. राज्यात १७ हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे. मुंबई पोलीसमध्ये पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदाची भरती होत आहे. एकूण ३४८९ पदांसाठी ही भरती जाहीर होत आहे.

policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

उमेदवारांच्या पात्रतेचे निकष

  • भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे.

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून १०वी किंवा १२ वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारासाठी सर्वसाधारण वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे आहे.

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला ४५० रुपये शुल्क भरावे लागेल.

  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३५० रुपये शुल्क भरावं लागणार आहे.

भरती प्रक्रियेचे स्वरूप

  • भरती प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. (Police Recruitment Process)

  • शारीरिक योग्यता चाचणीत उमेदवारानं किमान ५० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे.

  • भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षेदरम्यान किमान ४० टक्के गुण मिळविणं अनिवार्य आहे.

  • कमी गुण मिळालेले उमेदवार अपात्र ठरणार आहेत.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply