Police Detained MLA Rohit Pawar : नागपूरमध्ये संघर्ष यात्रेदरम्यान मोठी झटापट, रोहित पवारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Police Detained MLA Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेतून मोठी बातमी आहे. नागपूरमध्ये रोहित पवार यांची संघर्ष यात्रा पोलिसांनी अडवल्यानंतर कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. पोलिसांनी कार्यकर्ते आणि रोहित पवारांना ताब्यात घेतलं आहे. या झटापटीत एक कार्यकर्ता जखमी झाला असून पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला उपचारासाठी हॉस्पिटलकडे रवाना केलं आहे. पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं असून महिला कार्यकर्त्यांना अक्षरशः उचलून पोलीस व्हॅनमध्ये बसवलं.

संघर्ष यात्रा आज नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर आमदार रोहित पवार आणि कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्सवरून विधानभवन परिसरात प्रवेश केला. यावेळ नांदेड युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रोहित पवार आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. रोहित पवार यांनी अल्टिमेटम दिल्यामुळे संघर्ष यात्रा  हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर झडकली. मात्र निवेदन स्वीकारायला कोणीही आले नाही. त्यामुळे रोहित पवार आज आक्रमक झाले होते.

Pune News : मित्रांसोबत पर्यटनासाठी गेला अन् जीव गमावून बसला; १२०० फूट खोल दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

गेल्या दोन महिन्यांपासून रोहित पवार यांनी राज्यभर संघर्ष यात्रा काढली. या यात्रेदरम्यान त्यांनी तरुणांचे प्रश्न, आरोग्य, शेती विषयक प्रश्न जाणून घेतले. त्यांच्याशी चर्चा केल्या. या यात्रेचा आज नागपूरमध्ये समारोप होता. दरम्यान यावर रोहित पवार यांनी, शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या पोरांवर पोलीस लाठीचार्ज करत आहेत. ही कसली दडपशाही, असा सवाल केला आहे. सरकारला चर्चा करायची नाही. आमदाराची ही परिस्थिती असेल तर राज्यातील सामान्या जनतेची काय अवस्था असले याची कल्पना करा, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply