PMPML Bus Service : पीएमपीएमएलच्या फेऱ्या वाढवा, मावळातील प्रवाशांची मागणी

Maval News : पीएमपीएमएलने मावळ तालुक्यात बसच्या फे-यांची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशांतून हाेऊ लागली आहे. सर्वसामान्य नागरिकांना बसची सुविधा उपयुक्त ठरत असल्याने तसेच पीएमपीएमएलचा देखील आर्थिक फायदा हाेऊ शकताे. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाने आमच्या मागणीचा विचार करावा असे आवाहन प्रवाशांनी केले आहे. 

पीएमपीएमएलच्या निगडी आगारातून मावळ तालुक्यातील तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा, नवलाख उंबरे या ठिकाणी पीएमपीएमएल बस वाहतूक केली जाते. मात्र सध्या सुरु असलेल्या फेऱ्यांमध्ये बस प्रवाशांची गर्दी होत असते. त्यामुळे बसच्या आणखी फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Maratha Aarakshan : कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्य सरकारलाच, मनोज जरांगे मागण्यांवर ठाम; नितेश राणेंनाही सल्ला

याबराेबरच तालुक्यातील विविध भागात बस प्रवासी पीएमपीएमएल बसने प्रवास करतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारी ही एक सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. तर दुसरीकडे लोहमार्गा जवळ असलेल्या गावातील नागरिकांना पुणे लोणावळा लोकलची सुविधा आहे. परंतु त्याव्यतिरिक्त ग्रामीण भागातील नागरिकांना पीएमपीएमएल सोयीची आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply