PMPML : पुणेकरांसाठी खुशखबर! पीएमपीएमएलच्या ताफ्यात लवकरच १००० नव्या बसचा होणार समावेश

PMPML : पुणे व पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पीएमपीएमएलच्या ताफ्यात लवकरच एक हजार नवीन बस समाविष्ट केल्या जाणार आहेत. बुधवारी पीएमआरडीएने ५०० बस खरेदीचा निर्णय घेतला असून पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकादेखील ५०० बस उपलब्ध करून देणार आहेत.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात बसांची संख्या कमी असल्याने सार्वजनिक वाहतुकीवर ताण वाढला आहे, तर खासगी वाहनांच्या वाढत्या वापरामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर होत आहे. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने पुणे व पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पीएमपीएलसाठी नवीन बस खरेदीचे संकेत दिले होते. या उपाययोजनांमुळे सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळेल आणि वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.

Pulwama Attack : जरा याद करो कुर्बानी...! पुलवामा हल्ल्याला सहा वर्ष पूर्ण, १४ फेब्रुवारी रोजी नेमकं काय घडलं होतं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी सीएनजीवरील १००० बस खरेदीला मान्यता देण्यात आली. या बैठकीला पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. उपस्थित होते. निर्णयानुसार, पीएमआरडीए ५०० बस पीएमपीएलला उपलब्ध करून देणार आहे. या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.

पीएमआरडीएच्या अंदाजपत्रकात बस खरेदीसाठी तरतूद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांना ५०० बस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. सध्या या शहरांमध्ये ६००० बसांची गरज असून रस्त्यावर फक्त १६५० बस चालतात. आयुर्मान संपल्याने ३०० बस कमी होणार असल्याने बस खरेदीची मान्यता पीएमपीएमएमलसाठी महत्त्वाची ठरणार आहे. खरेदीसाठी ४०-४५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply