PM Narendra Modi : 'जय विज्ञान, जय अनुसंधान! ग्रीस दौऱ्यावरुन PM मोदी थेट बंगळुरूमध्ये दाखल; इस्रोच्या वैज्ञानिकांची घेतली भेट

PM Narendra Modi Bengluru: दोन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मायदेशी परतले. त्यांनी ग्रीसहून थेट बेंगळुरू गाठले आहे. 40 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच ग्रीस भेट होती.

पंतप्रधान मोदींच्या आधी इंदिरा गांधी यांनी 1983 मध्ये पंतप्रधान असताना ग्रीसला भेट दिली होती. ग्रीसवरुन पंतप्रधान मोदी थेट बंगलूरमध्ये पोहोचले. चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर ते शास्त्रज्ञांची भेट घेवून ते अभिनंदन करणार आहेत. (PM Narendra Modi Meet Isro Scientist)

जय जवान, जय किसान, जय अनुसंधान चा धारा....

पीएम मोदी कर्नाटकची राजधानी बेंगळुरूला (Bengaluru) पोहोचले आहेत. सकाळी सहा वाजता त्यांचे विमान एचएएल विमानतळावर उतरले. येथून पंतप्रधान मोदी इस्रोच्या मुख्यालयात पोहोचतील आणि चांद्रयान-३  मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या टीमला भेटतील. विमानतळावरून बाहेर पडण्यापूर्वी पंतप्रधानांनी स्वागताला उभ्या असलेल्या लोकांना संबोधितही केले. यावेळी त्यांनी "जय जवान, जय किसान, जय अनुसंधानचा" नारा दिला.

Tamil Nadu Fire News : तामिळनाडूत लघनऊ-रामेश्वर रेल्वेला भीषण आग, 8 प्रवाशांचा मृत्यू; तर 20 जण जखमी

पंतप्रधानांच्या स्वागताला मोठी गर्दी...

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताला नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी रोड- शो करत शक्तिप्रदर्शन केले. "मी दुसऱ्या देशात होतो, मात्र मी स्वतःला थांबवू शकत नव्हतो. त्यामुळे मी ठरवलं, की भारतात आल्यानंतर पहिल्यांदा बंगळुरूला जाईल. सर्वात आधी त्या वैज्ञानिकांना नमन करेल. सध्या मी शास्त्रज्ञांची भेट घेण्यास उत्सुक असल्याचे" त्यांनी सांगितले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply