PM Narendra Modi : स्वत: बाबासाहेब आंबेडकर आरक्षण संपवू शकत नाहीत, मग मोदींचा प्रश्नच नाही; पंतप्रधानांनी ठणकावून सांगितलं

PM Narendra Modi :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या दौऱ्यात भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सभेत इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. 'स्वत: बाबासाहेब आंबेडकर आरक्षण संपवू शकत नाहीत, मग मोदींचा प्रश्नच नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या सोलापुरातील सभेतील मुद्दे

> माझ्या प्रिय सोलापूरकरांना अतिशय मनापासून नमस्कार करतो. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो.

Ravindra Dhangekar On PM Modi : पुणेकरांचा पैसा प्रचारासाठी वापरला, आचारसंहिता भंग केली; मोदींच्या सभेवर रविंद्र धंगेकरांचा आक्षेप

>> मी खूप काही देऊ इच्छित आहे, मला धन-संपत्ती नको. मला तुमचे आशीर्वाद हवेत. मी आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे.

>> तुम्ही २०१४ आधी भ्रष्टाचार , दहशतवाद बघितला. कलंकित इतिहास असूनही काँग्रेस पुन्हा देशाची सत्ता मिळवण्याचा स्वप्न पाहत आहे. इंडिया आघाडीचा विश्वास फोल ठरला आहे. तुम्ही मोदींचं प्रत्येक पाऊल पाहिलं आहे.

> तुम्ही मोदींना ओळखता. तर दुसरीकडे इंडिया आघाडीत नेत्यांच्या नावावर युद्ध सुरु आहे. एवढा मोठा देश त्यांच्या हातात चुकूनही तुम्ही देऊ शकता का? सत्तेसाठी देशाची वाटणी करत आहे.

>> ते ५ वर्षात ५ पीएम अशी योजना आणत आहेत. प्रत्येक वर्षी नवीन पीएम. नकली शिवसेना म्हणत आहे की, त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा आहे. त्यांच्या पक्षाच्या बडबोले नेत्याने म्हटलं आहे, आम्ही चार पंतप्रधान बनवू. सत्ता मिळवण्याचा त्यांच्याकडे एकच रस्ता उरला आहे. फक्त यांना मलाई खायची आहे.

>> महाराष्ट्र सामाजिक न्यायाची धरती आहे. ज्योतिबा फुले, सावित्री बाई फुले, बाबासाहेब आंबेडकरांनी या वर्गाला ताकद दिली. तुम्ही काँग्रेसचे 60 वर्ष बघितलं आहे. मोदींचे 10 वर्षांचा सेवाकाळ ही बघितला आहे.

> मागच्या 10 वर्षात सामाजिक न्यायासाठी जेवढं काम झालं आहे. तेवढं मागच्या 60 वर्षात झालं नाही. एसटी, एससी ओबीसीचे हक्क रोखण्याचा प्रयत्न केला. सामाजिक न्यायासाठी आम्ही बळ दिलं. त्या लोकांनी मला आठवड्यातून एकदा तरी जेवण चारलं आहे. त्यांच्या खालेल्या मीठाला जागतोय.

>> आम्ही ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा दिला. मेडिकलमध्ये ओबीसींना आरक्षण दिलं. १० वर्ष आरक्षण वाढवलं. कोणाचा हक्का हिसकावून न घेता, आम्ही आरक्षण दिलं. सामान्य वर्गातील गरीब लोकांना न्याय देण्यासाठी आरक्षण दिलं. देशातील अनुसूचित जातींच्या नेत्यांनीही त्याचं स्वागत केलं.

>> मेडिकल आणि इंजिनिअरिंगमध्ये क्रांतिकारी निर्णय घेतला. काही लोकांना हे मस्करी वाटेल. आता गरीब आईच्या मुलाला आता डॉक्टर बनवायचं आहे.

>> प्रत्येक गरीबाच्या नशिबात इंग्लिश मीडियममध्ये शक्य होतं का? गरीब विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनिअर मराठी भाषेतून शिकायला मिळाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply