PM Narendra Modi : 'जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत कोणालाही धक्का लागणार नाही'; PM नरेंद्र मोदींची गॅरंटी

PM Narendra Modi : तामिळनाडुतील जाहीर सभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडी आणि द्रमुकवर जोरदार हल्ला चढवला. जलीकट्टू तामिळनाडुचा गौरव आहे, मात्र तामिळनाडुच्या संस्कृतीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असताना द्रमुक आणि काँग्रेसने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केलं. एनडीएच्या सरकारने जल्लीकट्टूचा सण उत्साहात साजरा करण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. यापुढेही जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत तामिळनाडुच्या संस्कृतीला कोणताही धक्का लागणार नाही, असं नरेंद्र मोदींनी ठणकावून सांगितलं

मोदींनी यावेळी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा मुद्दाही उपस्थित केला. अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी मी येथे आलो होतो. येथील प्राचीन तीर्थक्षेत्रांना भेट दिली होती, मात्र द्रमुकने मला अयोध्येतील अभिषेक सोहळा पाहण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला चांगलंच फटकारलं होतं. तामिळनाडूतील हा सत्ताधारी पक्ष इंडिया आघाडीत सामील असल्याची घणघाती टीका त्यांनी केली.

Eknath Khadse : अखेर ठरलं! रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे लढत होणार का? एकनाथ खडसेंनी स्पष्टचं सांगितलं

दिल्लीत संसदेची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. संसदेच्या उद्घाटनावेळी तमिळ संस्कृतीचे प्रतीक आणि या भूमीचे वरदान असलेल्या सेंगोलची स्थापना केली. मात्र या लोकांनी त्यावर बहिष्कार टाकला. सेंगोलची स्थापना केलेली या लोकांना आवडली नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply