PM Narendra Modi : मला तिसऱ्या टर्मसाठी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता, पण...; PM नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

PM Narendra Modi : भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्यकर्त्यांना संबाधित केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराचा दाखला देत त्यांनी राष्ट्रनिर्मितीचं स्वप्न समोर ठेवलं आणि राष्ट्रनिर्मितीसाठी पुढचे 100 दिवस नवीन उर्जा, नवा उत्साह, नवा आत्मविश्वास आणि नव्या उमेदीनं काम करण्याचं आवाहन केलं. दरम्यान मोदी यांनी अधिवेशनाला संबोधित करताच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.

10 वर्षांचा सदोष कार्यकाळ आणि 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणं सामान्य गोष्ट नव्हती. देश भ्रष्टाचार आणि दहशतवादापासून मुक्त झाला आहे. माझ्या दुसऱ्या कार्यकाळात एका जुन्या विरोधी नेत्याने तुम्ही आता विश्रांती घ्या, असे सांगितले होते. मी म्हणालो की आम्ही राजकारणासाठी नाही तर राष्ट्रीय धोरणासाठी काम करतो. आम्ही शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालतो. सत्ता उपभोगण्यासाठी मी तिसरी टर्म मागत नाही, तर राष्ट्रासाठी सत्तेत असल्याचं ते म्हणाले.

Cyber Crime : ऑनलाईन लुटमार करणाऱ्या भाऊ- बहिणीला अटक; ४८ चेकबुक, एटिएम कार्ड जप्त

मोदींच्या भाषणातील काही ठळक मुद्दे

18 फेब्रुवारी आहे आणि या काळात 18 वर्षांचे झालेले तरुण देशाच्या 18 व्या लोकसभेसाठी निवडून येणार आहेत.

पुढील 100 दिवस प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक वर्ग, समाज, पंथ, परंपरा या सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे.

गेल्या 10 वर्षात मिळालेलं यश आणि गती अभूतपूर्व आहे.

देशातील जनताच हे जग मोठ्या उत्साहाने सांगत आहे. आता देश मोठे संकल्प आणि मोठी स्वप्ने पाहणार आहे.

हा संकल्प भारताला विकसित करण्याचा आहे, ज्यामध्ये पुढील पाच वर्षे महत्त्वाची आहेत.

भाजपच्या अधिवेशनात देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपला संकल्प अधिक दृढ करणासंदर्भात चर्चा झाली.

सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भाजप सरकारचे जोरदार पुनरागमन आवश्यक आहे.

विरोधी पक्षनेतेही एनडीएला 400 जागा मिळणार असल्यांचं बोलत आहेत.

यासाठी भाजपला 370 चा टप्पा पार करावा लागणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply