PM Modi Speech At Nashik : घराणेशाहीचं राजकारण युवकांनी संपवायला हवं, PM नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही ठळक मुद्दे

PM Modi Speech At Nashik : भारत लोकशाहीची जननी असून यात तरुणांच मोठं योगदान आहे. देशातील तरुण तरुणींनी यापुढेही लोकशाही मजबूत करण्याचं काम केलं पाहिजे. घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचं मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे घराणेशाहीला लोकशाही प्रक्रियेपासून दूर ठेवलं पाहिजे. या प्रक्रियेत तरुणांचा जेवढा सहभाग जास्त असले तितकं देशाचं भविष्य उज्ज्वल असेल. देशाचं भविष्य असलेल्या या तरुण पिढीने येणाऱ्या काळात ही जबाबदारी स्वीकारावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेतून युवा पिढीला केलं. नाशिकमध्ये आयोजित युवा महोत्सवाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी तरुणांना आणि देशातील जनतेला संबोधित केलं.

नाशिकमध्ये आजपासून राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे. या महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते.

Cm Eknath Shinde : 'राममंदिर बांधून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केलं...' मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

मोदींच्या भाषणातील काही ठळक मुद्दे

आज भारत एकापेक्षा एक रेकॉर्ड तोडत असून मोठं मॅन्युफॅक्चरींग हब बनत आहे.याचं सर्व श्रेय्य युवकांना जातं.

चांद्रयान, आदित्य आदित्य एल-१ अंतराळ मोहिमा देशाचं मोठं यश

येणारा २५ वर्षांचा काळात भारताचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल.

देशाच्या विकासात नारी शक्तीचं मोठं योगदान



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply