PM Modi Pune Visit : मोदींकडून दगडूशेठ मंदिरात पूजा; रस्त्याच्या दुतर्फा जल्लोष करत पुणेकरांनी केलं पंतप्रधानांचं स्वागत

पुणेः लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज प्रदान करण्यात येईल. त्या निमित्ताने पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. मात्र, मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोधकांकडून कडाडून विरोध होत आहे.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राज्यपाल रमेश बैस यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं.

मोदींच्या हस्ते आज पुण्यातील मेट्रोचे लोकार्पण तसेच पंधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या हजारो घरांचे हस्तांतरण करणार आहेत. काँग्रेससह अनेक सामाजिक संस्थांकडून मोदींच्या दौऱ्याचा निषेध करत आंदोलन केले जात आहे. विरोधकांकडून पंतप्रधानांना मणिपूरच्या मुद्द्यावर काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत.

PM Modi Pune Visit : वायू सेनेच्या विशेष विमानाने पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल

दरम्यान, पुण्यात दाखल झाल्यानंतर पंतप्रधानांचा ताफा पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ मंदिराकडे निघाला. मोदींच्या हस्ते दगडूशेठ मंदिरात पूजा संपन्न झाली. त्यानंतर ते पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाकडे रवाना झाले आहेत. कार्यक्रमामध्ये मोदी काय बोलणार, याकडे सबंध देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply