PM Modi Mumbai Visit : PM मोदी आज मुंबई दौऱ्यावर; जाणून घ्या वाहतूक मार्गातील बदल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. 19 जानेवारीनंतर पंतप्रधान मोदींची महिनाभरात दुसरा मुंबई दौरा आहे . या दौऱ्यात ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत . पीएम नरेंद्र मोदी मुंबईत येणार म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी काही वाहतूक मार्गात बदल केला आहे. 

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीती शक्यता असल्याने पोलिसांकडून घबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमिवर आज दुपारी 2.45 ते 4.15 पर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

ईस्टर्न फ्री वे मार्गावरची वाहतूक बंद करून, ती डी एन रोड आणि जे जे ब्रिजवर वळवली आहे. त्यामुळे वाशीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाण्यासाठी वाहनांनी ईस्टर्न फ्री वे मार्गाचा वापर न करता पूर्व द्रुतगती मार्गाचा वापर करावा. कुलाब्यातल्या बधवर पार्क, कफ परेड आणि नेव्ही नगरची वाहतूक मंत्रालयाकडून वळवण्यात आली आहे.

वेस्टर्न एक्सप्रेस वे वर अंधेरी, घाटकोपर-कुर्ला रोड या दोन्ही वाहिन्यांवरील मरोळ नाक्याच्या दिशेने येणारी वाहने ही साकीनाका जंक्शन येथून साकी विहार रोडने मिलिंद नगर एल. अॅन्ड टी.गेट नं.8 येथून डावे वळण घेउन जे.व्हि.एल.आर. रोडने पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे मार्गस्थ होतील.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply