Pimpri Chinhcwad : ऑनलाइन टास्क देत 20 कोटींचा घातला गंडा, सायबर गुन्हे शाखेने 8 जणांना ठाेकल्या बेडया

Pimpri Chinhcwad : लोकांना सोशल मीडियावर ऑनलाइन टास्क देऊन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने एका टोळीला नुकतीच अटक केली आहे. या टाेळीने वेगवेगळ्या बँकेत वेगवेगळ्या नागरिकांचे कागदपत्र वापरून बँक खाते देखील उघडल्याची माहिती समाेर आली आहे.

साेशल मिडीयातून सायबर फ्रॉड करणाऱ्या टोळीने वेगवेगळ्या बँकेत बँक अकाउंट उघडून नागरिकांना 20 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समाेर आले आहे. या टोळतील अल्ताफ मेहबूब शेख, मनोज शिवाजी गायकवाड, अनिकेत भाऊराव गायकवाड, हाफिज अली अहमद शेख, पवन विश्वास पाटील, चैतन्य संतोष आबनावे, सौरभ रमेश विश्वकर्मा आणि कृष्णा भगवान खेडेकर असे आठ जणांना सायबर गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Pune Girls Hostel Fire : पुण्यात वसतिगृहाला भीषण आग; एकाचा मृत्यू तर ४८ मुलींना सुखरुप बाहेर काढण्यात यश

ऑनलाइन सायबर फ्राॅड करण्यासाठी या टोळीने नागरिकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड सारखे मुळ कागदपत्र घेऊन वेगवेगळ्या बँकेत त्यांच्या नावाने बँक खाते उघडत असे. बँक खाते उघडल्यानंतर त्या खात्यात वापरण्याच्या बदल्यात त्या नागरिकांना दोन हजार ते पाच हजार रुपये इतकी रक्कम देत होते असं पोलिस तपासांत उघडकीस आले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply