Pimpri-Chinchwad Traffic Jam : पिंपरी-चिंचवडमधील भूमकर चौकात प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनाच्या लांबचलांब रांगा

Pimpri-Chinchwad Traffic Jam : पिंपरी-चिंचवड शहरातील भूमकर चौक येथे मुंबई-बेंगलोर हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे हायवेवर लांब वाहनाच्या मोठमोठ्या रागा लागल्या आहेत.

आयटी नगरी हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्यातील वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी म्हणून वाकड वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांपासून प्रायोगिक तत्त्वावर भूमकर नगर, विनोदे नगर, विनोदे चौक, लक्ष्मी चौक या मार्गात एकेरी वाहतूक सुरू केली आहे.

या प्रयोगामुळे भूमकर चौकाने बऱ्यापैकी मोकळा श्वास घेतला. मात्र कस्तुरी चौक, विनोदे नगर चौक अन लक्ष्मी चौक रस्त्यावर वाहनांच्या मोठाल्या रांगा लागत आहेत. एवढेच नाही तर स्थानिक रहिवाशांना शंभर मीटर अंतरावरील घरी जाण्यासाठी तब्बल दोन ते तीन किमीचा वळसा मारून आपल्या घरी जावे लागत असल्याने स्थानिक रहिवाशी प्रचंड नाराज आहेत.

वाहतूक पोलिसांचे प्रायोगिक तत्व अन रहिवाशांचे सत्व अशी चर्चा वाकड-हिंजवडी परिसरात जोरावर आहे. रहिवाशांनी अन्य काही तोडगा काढून या वाहतुक कोंडीतून मुक्तता करावी अशी विनंती वाहतूक पोलीस प्रशासनाला केली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply