Pimpri Chinchwad News : आयटी सीटी हिंजवडीत सुरू होता भलताच प्रकार; पिंपरी चिंचवडचे पोलीसही चक्रावले

Pimpri Chinchwad News : आयटी सीटी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या पथकाने धाड टाकून देहविक्री करणाऱ्या तीन पीडित मुलींची सुटका केली आहे. हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील डिंनस रसिडेन्सी सोसायटीमधील फ्लॅट नंबर 302 मध्ये देहविक्री सुरू होती. त्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यावरून धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सूर्यकांत पंडित देवरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Rohit Pawar : शरद पवार वस्तादासारखे शेवटचा डाव राखून ठेवतात; रोहित पवारांचा सूचक इशारा कोणाला?

सूर्यकांत पंडित देवरे हा दलाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी डिंनस सोसायटीतील फ्लॅटमध्ये काही मुलींना वेश्याव्यवसाय करायला लावत होता. याची गोपनीय माहिती मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला प्राप्त झाली होती. त्या गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकून पोलिसांनी देहविक्री करणाऱ्या तीन पीडित मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणातील आरोपी सूर्यकांत पंडित देवरे या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याविरोधात भा द वी 307, (3) सह देहविक्री प्रतिबंधक अधिनियम 1956 कलम 3,4,5 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply