Pimpri Chinchwad News : ५ लाख ४० हजारांचे मेफेड्रोन ड्रग्स जप्त; जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर पोलिसांची कारवाई

Pimpri Chinchwad News : जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल ५ लाख ४० हजारांचे मेफेड्रोन ड्रग्स जप्त केले आहे.  पिपरी- चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने हि कारवाई केली आहे.

पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड  पोलिसांनी ड्रग्स तस्करी विरोधात कारवाई केली आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना पुणे- मुंबई महामार्गावर अज्ञात व्यक्ती मेफेड्रोन घेऊन येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत शहजाद आलाम अब्बास कुरेशी (वय ३८) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

Exam Paper Leaks : राज्यात चाललंय काय? मृद व जलसंधारण विभागाचा पेपर फुटला, विद्यार्थी संतप्त

१६ लाखाचा मुद्देमाल हस्तगत 

शहजाद आलम अब्बास कुरेशी याने मेफेड्रॉन ड्रग्स मुंबईतील रिझवान चाँदीवालाकडून आणल्याचं प्राथमिकतपासात समोर आलं आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाकडून १० लाखांची महागडी चारचाकी गाडी असा एकूण १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply