Pimpri Chinchwad News : शस्त्राचा धाक दाखवून रोकड लांबविली; लूटमार करणारी टोळी ताब्यात

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील मेडिकल दुकानदाराला धारदार शस्त्राचा धाक दाखवून लूटमार केली होती. मेडिकल दुकानातून रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड  परिसरात ७ फेब्रुवारीला आशिष दिलीप शहा हे त्यांच्या कलाटेनगर भागातील चंदन फार्मसी मेडिकलवरून दुकान बंद करून जात होते. या दरम्यान पाच अनोळखी इसमांनी त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या ताब्यातील ४५ हजार ५६० रुपये रक्कम घेऊन फरार झाले होते. या गुन्ह्यात गुन्हा करत असताना आरोपींनी तोंडाला मास्क लावल असल्याने त्यांची ओळख पटविण्याचा मोठा आव्हान पोलिसांसमोर होते. 

Raju Patil : जरांगेच्या तब्येतीची दखल घेणे गरजेचे, सरकारने कोणाच्या जीवाशी खेळू नये... मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला फटकारले!

तपास करत पाचही आरोपी ताब्यात 

मात्र वाकड पोलिसांनी तपास करत या गुन्ह्यातील चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर एका विधी संघर्षीत बालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. व्यंकटेश उर्फ हर्षल परशुराम जाधव, आदर्श परशुराम शिंदे, गोविंद लालू रूपवते आणि प्रतीक दौडकर अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. यातील काही दरोडेखोर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply