Pimpri Chinchwad : मध्यरात्री कारवर बसून हुल्लडबाजी; तरुणांना जमिनीवर बसवून पोलिसांनी दिला चोप

Pimpri Chinchwad : मध्यरात्रीच्या सुमारास भर रस्त्यात कारचे सर्व दरवाजे उघडे केले. यानंतर कारच्या छतावर बसून व मोठ्या आवाजात गाणे वाचवत काही तरुण रस्त्यात राडा घालत होते. या हुल्लडबाज तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेत खाक्या दाखवला आहे. तरुणांना जमिनीवर बसवून पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. 

पिंपरी चिंचवड शहरात तरुणांनी हा हुल्लडबाजी केल्याचा प्रकार घडला आहे. मध्यरात्री भर रस्त्यात कारचे सर्व दरवाजे उघडे ठेवून तसेच कारच्या छतावर बसून तसेच मोठमोठ्याने कार मधील लाऊड स्पीकर वाजवून काही हुल्लडबाज तरुणांनी पिंपळे निलख परिसरातील न्यू डी पी रोडवर धिंगाणा घातला होता. यामुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला होता. काहीनागरिकांनी पोलिसात तक्रार दिली होती. 

दरम्यान हुल्लडबाज तरुण न्यू डीपी रोडवर धिंगाणा घालत असतानाचा विडियो काही संजग नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद करून सांगवी पोलिसांना या प्रकरणाची तात्काळ माहिती दिली. त्यानंतर त्या ठिकाणी अवघ्या काही मिनिटात दाखल झालेल्या सांगवी पोलिसांनी हुल्लडबाज तरुणांना चांगल्याच पोलीस खाक्या दाखवला. यानंतर हुल्लडबाज तरुणांना जमिनीवर बसवून चांगला चोप दिला आहे. 

पोलिस हुल्लडबाज तरुणांना जमिनीवर बसवून चोप देत असतानाचा विडियो देखील त्या परिसरातील नागरिकांनी आपला मोबाईल मध्ये कैद केला आहे. तर हुल्लडबाज तरुणांना वेळीच पोलिसांनी धडा शिकवल्याने पिंपळे निलख परिसरातील नागरिक पोलिसांच्या तत्पर कारवाई विषयी समाधान व्यक्त करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *