Pimpri Chinchwad : मोशीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड!

Pimpri Chinchwad : मोशी मध्ये दोन टोळक्यांनी काही वाहनांची तोडफोड  केली होती. याप्रकरणी भोसरी एम.आय.डी.सी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. नागरिकांमधील भीतीच वातावरण कमी करण्यासाठी या नऊ जणांची घटनास्थळावरून धिंड काढण्यात आली. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास मोशी मध्ये दोन टोळक्यांमध्ये झालेल्या वादातून दोन ते तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.

बुलेट च्या आवाजावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झालं होतं. पैकी, काही जणांनी मोठा दगड घेऊन दुचाकी वाहनांची तोडफोड केली होती. या घटनेनंतर भोसरी एम.आय.डी.सी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अवघ्या काही तासांमध्ये आरोपींचा शोध घेऊन बेड्या ठोकल्या. आरोपींची घटनास्थळावरून धिंड काढण्यात आली.

Pune : दिल्ली गोवा एक्सप्रेसला मिळाला जेजुरी थांबा; कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश

कान पकडून त्यांना त्या परिसरातून पोलिसांनी माफी मागायला लावली. बुधवारी दुपारी के.एस.बी चौकात देखील पाच ते सहा वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी देखील आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांना लक्ष केलं जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच मोठ नुकसान होताना दिसत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *