Pimpri Chinchwad Fire : पिंपरी चिंचवडमधील कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन भीषण आग, अग्निशमन दलाचे १० अग्निबंब घटनास्थळी

Pimpri Chinchwad Fire : राज्यात दिवसभरात तीन ते चार आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यात पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडीतही आगीच्या दुर्घटनेचीही भर पडली. पिंपरी चिंचवड परिसरातील एका कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. त्यानंतर या कंपनीत मोठी आग लागल्याची घटना घडली. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरातील एच आय कंपनीला आग लागल्याची घटना घडली. कंपनीतील बॉयलरचा स्फोट होऊन मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे. 

Crime News दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड; 10 लाख 83 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

कंपनीला आग लागल्यानंतर उपस्थित नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती कळवली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. कंपनीतील बॉयलर फुटल्याने आगीने रौद्र रुप धारण केलं होतं. आगीची माहिती मिळताच पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंब वापरून आग आटोक्यात आणली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply