Pimpri Chinchwad Crime : किरकोळ वादातून भयानक कृत्य; छातीवर स्क्रू ड्रायव्हरने वार, रिक्षा चालकाचा मृत्यू

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड जकात नाका परिसरात रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून एका जणाने छातीवर स्क्रू ड्रायव्हरने जोरदार वार केला. यात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

पिंपरी चिंचवड शहरात ऑटो रिक्षा चालकाच्या खुनाच्या धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे. यात रिक्षा चालक व एका व्यक्तीमध्ये वाद सुरु होता. त्यांचा वाद मिटविण्यासाठी अन्य एकजण प्रयत्न करत होता. याच वादात एक व्यक्ती ऑटो रिक्षा चालकावर स्क्रू ड्रायव्हरने वार करताना दिसत आहे. स्क्रू ड्रायव्हरने छातीवर वार केल्यामुळे ऑटो रिक्षा चालकाच्या हृदयावर गंभीर जखम झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Buldhana : उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा; महिलांना उलटी. पोटदुखीचा त्रास, उपचारासाठी दाखल

किरकोळ वादातून एका व्यक्तीने ऑटो रिक्षा चालकावर स्क्रू ड्रायव्हरने वार करत त्याचा खून केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून रिक्षा चालकाला मारल्यानंतर आरोपी हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. दरम्यान या प्रकरणात चिंचवड पोलिस ऑटो रिक्षा चालकावर वार करणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply