Pimpri Chinchwad : बंदोबस्तावर असलेल्या दोन वाहतूक पोलिसांना भरधाव कारनं चिरडलं, युवकास अटक

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात भरधाव कारचालकाने बंदोबस्तावर असलेल्या दोन वाहतूक पोलिसांना चिरडले. या घटनेत दोन्ही वाहतूक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. एका पाेलिस कर्मचा-याची प्रकृती गंभीर बनल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आळंदी - दिघी वाहतूक विभागाचे अधिकारी व अंमलदार हे डी.वाय. पाटील कॉलेज जवळ वाहतूक नियमन कारवाई करीत हाेते. यावेळी प्रशांत कदम (वय 20) हा कार भरधाव वेगाने चालवीत असल्याचे आढळले. त्याच्या कारच्या सर्व काचा काळ्या (नियमबाह्य) हाेत्या.

Raj Thackeray : मनसेचा शिवाजी पार्कवर आज गुढीपाडवा मेळावा; राज ठाकरे काय बोलणार?

वाहतूक अंमलदार राहुल मोटे व कल्याण भोसले यांनी प्रशांत कदम याला कार थांबविण्याचा इशारा केला मात्र प्रशांतने राहुल मोटे व कल्याण भोसले यांचे आदेश न पाळता जाणीवपूर्वक वाहतूक कारवाई टाळण्याच्या उद्देशाने त्याच्या कडील कार राहुल मोटे यांना जोरात धडक देवून गंभीर जखमी केले. 

या घटनेत राहुल गंभीर झाले तर कल्याण भोसले हे किरकोळ जखमी झाले. प्रशांत कदम याच्यावर दिघी पोलिस ठाण्यात (भादवि 307, 353 ,333, 279 व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply