Fraud Case : गुंतवणूक करण्याचे सांगत कोट्यवधी रुपयांची फसवणूक; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

Pimpri Chinchwad : व्हेंट्रॉस डॉट कॉम या वेबसाईटवर कोट्यावधी रुपये गुंतवणूक करण्यास लावून गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयाची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी तपास सुरु असताना फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर गुन्हे पोलिसांनी अहमदाबाद आणि मीरा-भाईंदर इथे जाऊन बेड्या ठोकल्या आहेत.

ऑनलाईन फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. तर काहीजणांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगत चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. अशाच प्रकारे पिंपरी चिंचवड शहरातील अनेकांना व्हेन्ट्रॉस डॉट कॉम या वेबसाईटवर गुंतवणूक करण्यास लावून फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सायबर पोलिसांनी तपास करण्यास सुरवात केली होती.

दोघेजण ताब्यात पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी तपास करताना दोन जणांना अहमदाबाद व मीरा- भाईंदर येथून ताब्यात घेतले आहे. यात मितेश राजू भाई व्होरा (वय ३४) आणि केपीन अजित कुमार मेहता (वय ४१) अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपीची नाव आहेत. या दोन्ही आरोपींनी मिळून म्युअल अकाउंट मधून गुंतवणूकदारांचे फसवणूक केलेले कोट्यावधी रुपये बाहेर काढले आहेत.

फसवणुकीत आणखी काहीजणांचा सहभाग?

दरम्यान फसवणूक झाल्याच्या गुन्ह्यात दोघेजण पोलिसांच्या ताब्यात सापडले असून फसवणूक करणाऱ्या आरोपींचे अजून काही साथीदार असल्याचा संशय सायबर पोलिसांना आहे. त्या दृष्टिकोनातून सायबर पोलीसांकडून दोघांची चौकशी करण्यात येत असून त्या अनुषंगाने पुढील तपास करत आहेत.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply