Pimpri Chinchwad : दारू पिण्यासाठी पैसे हिसकावत केली हत्या; तीनजण पोलिसांच्या ताब्यात


Pimpri Chinchwad : चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील वन विभागाच्या जागेत एका ३३ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून तसेच दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली होती. याबाबत कोणताही ठोस पुरावा नसताना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी संशयित तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून संशयितांची कसून चौकशी सुरु आहे.

पिंपरी चिंचवड शहर हद्दीत असलेल्या चिखली पोलीस स्टेशन हद्दीत भैय्या गमन राठोड (वय ३३) या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती. दारू पिण्यासाठी पैसे बळकवताना आरोपींनी भैय्या गमन राठोड याच्यावर धारदार शस्त्राने वार करून तसेच त्याच्या तोंडावर दगड घालून त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु होता.

Pune News : गोध्रा हत्याकांडातील आरोपीचे पुणे, नाशिक कनेक्शन, परोलवर बाहेर येत केले १६ गंभीर गुन्हे

ठोस पुरावा नसताना आरोपी ताब्यात

दरम्यान सदरच्या खून प्रकरणात कोणताही ठोस पुरावा नसताना देखील पिंपरी- चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक एक पथकाने अवघ्या २४ तासाच्या आत खून करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये सुरज हनुमंत इंगळे, मेहुल कैलास गायकवाड आणि अजय अशोक कांबळे या तीन आरोपींनी मिळून भैय्या गमन राठोड या तरुणाचं खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

तिघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल

दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली असता भैय्या गमण राठोड याचा खून करणारे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांच्यावर यापूर्वी सुद्धा चिखली, पिंपरी आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply