Pimpri-Chinchwad : मला माफ करा, आत्महत्येआधी व्हिडिओ व्हायरल केला; मग रिक्षाचालकानं संपवलं आयुष्य

 

Pimpri-Chinchwad  : मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या सावकाराला कंटाळून एका रिक्षा चालकानं अत्यंत टोकाचं पाऊल उचललंय. व्हिडिओ तयार करून तरूणानं आत्महत्या केलीय. व्हिडिओमध्ये रिक्षा चालकानं, 'माझ्या छोट्या मुलीला सांभाळा, माझ्या अंत्यसंस्कारासाठी माझ्या पत्नीकडे पैसे नाहीत. त्यामुळे मला इलेक्ट्रॉनिक भट्टीमध्ये जाळा' असं म्हणत त्यानं घरात गळफास घेत आत्महत्या केलीय. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या सावकाराला कंटाळून, एका रिक्षा चालकानं आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीय. तरूणानं आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ तयार केला. व्हिडिओमध्ये, 'मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे. मला माफ करा'. असं म्हणत व्हिडिओ तयार केला आणि सोशल माध्यामांमध्ये व्हायरल केला.

राजू नारायण राजभर असं रिक्षा चालकाचे नाव असून, हा तरूण चिंचवड येथील साईनगर भागातील रहिवासी होता. त्यानं घरातच गळफास घेत आत्महत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी रिक्षा चालक राजू नारायण राजभर याने व्हिडिओमध्ये सावकारांची नावं घेतली आहेत. रजनी सिंग,राजीव कुमार उर्फ गुड्डू भैया, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे या चार सावकाराच्या जाचाला कंटाळून, आत्महत्या करत असल्याचं त्यानं सांगितलं. त्यानं व्हिडिओ तयार केला, सोबतच सुसाईड नोट देखील लिहिली आहे.

Pune : पुण्यात हिंदी-मराठी वाद पेटला, मनसे कार्यकर्त्यांनी एअरटेलच्या कर्मचाऱ्याला धू धू धुतला, नेमकं काय झालं?

आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळं रिक्षा चालकाने व्हिडिओमध्ये, माझ्या छोट्या मुलीला सांभाळा, अंत्यसंस्कारासाठी माझ्या पत्नीकडे पैसे नसल्यानं मला इलेक्ट्रॉनिक भट्टीमध्ये जाळा, असं म्हणत तरूणानं व्हिडिओ सोशल माध्यमात पोस्ट केला. नंतर घरात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला. पोलिसांनी रजनी सिंग, राजीव कुमार, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे या चार आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply