Pimpri : विशेष मोहिमेत १२१ शस्त्रे जप्त; पिंपरी पोलिसांची कामगिरी

Pimpri : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा विशेष मोहीम राबवण्यात आली. २० फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२५ दरम्यान राबविलेल्या या मोहिमेत १२१ शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यामध्ये ३३ पिस्तूल आणि ३४ काडतूस यासह अन्य घातक शस्त्रांचा समावेश आहे.

या विशेष मोहिमेत एकूण १२१ गुन्हे दाखल करण्यात आले. यात ३३ पिस्तूल, ३४ काडतूस, ७६ कोयते, सात तलवारी, दोन सुरे, दोन सत्तूर आणि एक पालघन अशा विविध प्रकारच्या घातक शस्त्रांचा समावेश आहे. पिंपरी, भोसरी, सांगवी, वाकड, हिंजवडी, चिखली, चाकण आदी ठिकाणच्या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात कारवाई करण्यात आल्या. स्थानिक पोलीस ठाण्यांसोबतच गुन्हे शाखेचे सर्व विभाग, मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक आणि अन्य तपास पथकांनी एकत्रितपणे समन्वय साधत ही कारवाई केली.

या मोहिमेअंतर्गत राबवलेल्या कार्यक्षमतेवर आधारित स्पर्धेत मालमत्ता विरोधी पथकाने ४२ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. यापूर्वीही याच पथकाने अशाच मोहिमेत आघाडी घेत वेगळेपण दाखवले होते. पोलीस ठाण्यांमध्ये दिघी पोलीस ठाणे २४ गुण मिळवून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.

Pune : महापालिकेचे १० जलतरण तलाव बंद, शहरातील २५ तलाव सुरू

या मोहिमेत सहभागी पथकांच्या कामगिरीचे मूल्यमापन जप्त केलेल्या शस्त्रांच्या प्रकारांवर आधारित गुणपद्धतीने करण्यात आले. पिस्तुलसारख्या अति धोकादायक शस्त्रांना दहा गुण, तर कोयता, तलवार, सुरा यांस एक गुण देण्यात आला. या गुणांकन पद्धतीमुळे कार्यक्षमतेची वस्तुनिष्ठ मोजणी करणे शक्य झाले. या मोहिमेद्वारे अवैध शस्त्र विक्री करणारे, बाळगणारे आणि वापरणारे यांंच्यावर लक्ष ठेवून सातत्याने कारवाई केली जात आहे.

यापुढेही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शस्त्र विरोधी मोहिमेत १२१ अवैध शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये ३३ पिस्तूल आणि ३४ काडतुसांचा समावेश आहे. तिसऱ्यांदा राबवलेल्या या विशेष मोहिमेत मोठा शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला आहे. या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणारे पथक आणि पोलीस ठाण्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply