
Pimpri : बनावट शेअर ट्रेडिंग अॅपमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत हिंजवडी येथील एकाची पाऊणकोटीची फसवणूक करणार्या टोळीतील दोघांना पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने छत्रपती संभाजीनगर येथे जेरबंद केले. आरोपींच्या बँक खात्यात चार कोटीचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
साजिद शहा कासम शहा (३०), अभिजित रामराव श्रीरामे (३२, दोघे रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या इतर साथीदांराचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी याबाबत माहिती दिली. हिंजवडी येथील एकाने फसवणूक प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. जुलै २०२४ मध्ये फिर्यादी फेसबुक पाहत असताना ट्रेडींग बाबतची जाहिरात आली. जाहिरीतीमधील लिंक क्लिक केली असता, त्यांना एका व्हाटसअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यानंतर संशयितांनी तक्रारदाराला अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
|
|
अॅपमार्फत शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. बँक खात्यावर ७४ लाख घेऊन फसवणूक केली. या गुन्ह्याचा सायबर सेलमार्फत समांतर तपास सुरू होता. बँक खात्याबाबत तांत्रिक विश्लेषण केले असता, त्यामधील संशयित हे छत्रपती संभाजीनगरचे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सायबर सेलचे पथक छत्रपती संभाजीनगर येथे गेले.
पथकाने तांत्रिक विश्लेषण करून खातेधारक साजिद आणि अभिजित यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन मोबाईल जप्त केले. संशयितांनी फसवणुकीसाठी वापरलेल्या बँकेच्या खात्यावरून फसवणूक झाल्याप्रकरणी ‘एनसीसीआर पोर्टल’वर ५६ तक्रारी दाखल आहेत. त्याच खात्यामध्ये चार कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, फौजदार सागर पोमण, पोलिस अंमलदार दीपक भोसले, अतुल लोखंडे, प्रिया वसावे, अशोक जावरे, श्रीकांत कबुले, अभिजीत उकीरडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

