Pimpari Chinchwad Fire : पिंपरी चिंचवडमध्ये अग्नितांडव! बिल्डिंगला लागलेल्या आगीत २ घरांसह २० दुचाकी जळून खाक

Pimpari Chinchwad Fire : पिंपरी चिंचवडमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर भागातील एका वसाहतीमध्ये रविवारी (२४ डिसेंबर) मध्यरात्री भीषण आग लागली. या भीषण आगीत दोन घरे आणि जवळपास 20 दुचाकी वाहने पुर्णपणे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवडच्या नेहरूनगर परिसरामध्ये विठ्ठल नगर नावाच्या वसाहतीमधील पाच नंबरच्या बिल्डिंगमध्ये रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीने अवघ्या काही क्षणात रौद्ररूप धारण केल्याने बिल्डिंग मधील दोन घरांसह २० दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या.

Corona JN.1 Veriant Update : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आवाज जाण्याचा धोका; संशोधनात धक्कादायक खुलासा

याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. ज्या बिल्डिंगमध्ये आग लागली त्या बिल्डिंगचे निर्माण पिंपरी चिंचवड महापालिकेने केला आहे. मात्र ह्या रहिवासी बिल्डिंगमधील फायर फायटिंग सिस्टम नसल्याने आगीने रौद्ररुप धारण केले.

सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी मोठी वित्तहानी झाली आहे. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप समोर आले नाही, मात्र बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये अज्ञातांनी दुचाकी वाहनांना आग लावली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply