Peb Fort News : मुंबईची IT इंजिनीअर तरुणी पेब किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत कोसळली, ७ तास चाललं रेस्क्यू ऑपरेशन

Peb Fort News : कर्जत तालुक्यातील माथेरानजवळील पेब  किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेली २७ वर्षीय आयटी इंजिनीअर तरूणी ४०० फूट खोल दरीत कोसळली. शनिवारी दुपारी ही घटना घडली. सात तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

मुंबईतील अंधेरी येथील २७ वर्षीय तरूणी ऐश्वर्या धालगडे पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेली होती. पेब किल्ल्यावरून परतत असताना तिचा पाय घसरला आणि ती ४०० फूट खोल दरीत पडली.

Chhagan Bhujbal : ''महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाहीत, कारण...'' छगन भुजबळांनी गणित सांगितलं, जरांगेंवर हल्ला

पाच जणांचा ग्रुप पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. त्यात ऐश्वर्या देखील होती. ते सर्व जण पेब किल्ल्यावर पोहोचले. किल्ल्यावरून ते पायथ्याशी येत होते. व्ही आकाराच्या दरीजवळ ऐश्वर्याचा पाय घसरला आणि ती थेट दरीत कोसळली. दरीतील झाडामुळं ती बचावली. तिच्या कंबरेला आणि पायाला दुखापत झाली आहे.

नेमकं काय घडलं?

ऐश्वर्या ही ओशिवराची रहिवासी आहे. तिच्यासोबत अनिकेत मोहिते आणि अंकिता मराठे हे अंधेरीतीलच  दोन मित्र आणि रुपेश वीर आणि तन्वी पार्टे हे दोघे ठाण्यातील मित्र होते. पाचही जण पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले. तेथून तिथून ते परत येत होते. एक किलोमीटरवर आले असता, ऐश्वर्याचा पाय घसरला.

घटनेनंतर तात्काळ त्यांच्यातील एका मित्राने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. माथेरान पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. नेरळजवळील आंबेवाडी येथील आदिवासींनीही तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यानंतर पोलीस, 'सह्याद्री'चे स्वयंसेवक, वन कर्मचारी, डॉ. सचिन वाणी आणि इतर घटनास्थळी पोहोचले. तेथून जवळच असलेल्या रस्त्यावर रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply