Parola Bajar samiti: विद्यमान सभापतींना धक्‍का; शिंदे गट आमदाराचा पराभव करत ‘मविआ’चे वर्चस्व

पारोळा (जळगाव) : येथील बाजार समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, डॉ. हर्षल माने यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या मार्केट बचाव पॅनलने १५ जागा मिळवून बाजार समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेना शिंदे गटाच्या जयकिसान पॅनलला ३ जागा मिळाल्या. विद्यमान बाजार समिती सभापती अमोल चिमणराव पाटील यांना ३१६ मते मिळाली असून, ते पराभूत झाले आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांना ४०२ मते मिळाली असून, ८६ मताधिक्याने विजयी झाले आहे. सेवा सहकारी मतदारसंघात सर्वसामान्य गटातून माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांना ४७६ मते मिळाली असून, ते विजयी झाले आहेत.

निवडणूक यशस्वितेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी महेश कासार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सिंहले तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पारोळा मंडळ अधिकारी यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, येथील चुरशीच्या बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या छत्रीने विजय संपादन केल्याने बाजार समिती ते महामार्ग तसेच कजगाव रस्ता ते माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत सवाद्य मिरवणुकीसह गुलालांची उधळण करण्यात आली.

केवळ तीन जागांवर विजय

पारोळा बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचे मार्केट कमिटी बचाव पॅनल व शिंदे गटाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांचे जयकिसान पॅनलमध्ये सरळ लढत झाली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील तसेच ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हर्षल माने यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे पॅनलने बाजी मारली आहे. या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या जयकिसान पॅनल ला केवळ तीन जागांवरच विजय मिळवता आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply