Parola Accident : पारोळ्याजवळ भीषण अपघात..अंत्ययात्रेला जाताना काळाची झडप; कंटेनरच्या धडकेत ३ ठार, २१ गंभीर

Parola Accident : पारोलाजवळ बायपास रस्त्यावर कंटेनरने प्रवाशी वाहतूक करणाऱ्या पीकअपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर २१ जण गंभीर जखमी झालेत आहेत. सर्व जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले. 

बोळे येथून चिलाणे येथे अंत्यसंस्कारासाठी काहीजण पिकअप गाडीने जात होते. या गाडीत २२ महिला- पुरुष बसलेले होते. दरम्यान दुपारी १२ वाजेच्या सुमारास लोखंडी रोल असलेला एक कंटेनर समोरून येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने पीकअपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रेखा बाई गणेश  कोळी (वय ५५), योगिता रवींद्र पाटील (वय ४०), चंदनबाई नानाभाऊ गिरासे (वय ६५) यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर २१ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

Pandharpur News : विठुरायाच्या चरणी भाविकांचे भरभरुन दान, कार्तिकी यात्रेत भाविकांची संख्या निम्मी होऊनही देवाची तिजोरी भरली

जखमींना रुग्णालयात दाखल

सदर अपघातात भरत गिरासे, रणजित गिरासे, राजेश कोळी, भिमकोर गीरासे, भुराबाई गीरासे,चंदनबाई गीरासे, रेखा बाई गीरासे, नाना गीरासे, भटा गीरासे, सुनीता गीरासे ,धुराबाई गीरासे ,रेखाबाई कोळी,अजतसिंग गीरासे, सय्यद लीहायत, हिराबाई गीरासे, भिमकोरबाई गीरासे, भगवान गिरासे,  रणजितसिंग गीरासे, रुपासिंग गीरासे, दश्याबाई गिरासे व राजेबाई कोळी असे एकूण २२ जण गंभीर जखमी झालेत. इतरांवर प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. या[घाताची माहिती मिळताच कुटीर रुग्णालयास गर्दी झाली होती. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply