Parbhani News : महावितरणचा भोंगळ कारभार! विजेचा शॉक लागून एक वर्षाच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू, परभणीतील धक्कादायक घटना

Parbhani News : परभणी  जिल्ह्यातील सेलूमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. विजेचा झटका लागून मायलेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. सेलू तालुक्यातील रवळगावमध्ये ही घटना घडली आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ही घटना घडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेलू तालुक्यातील रवळगाव येथील शाहूनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. विजेचा झटका लागल्याने मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिक्षा राहुल मकासरे (वय 27 वर्षे) तर इंदू राहुल मकासरे (वय 1 वर्ष ) असे मृत्यू झालेल्या मायलेकींची नावं आहेत. दिक्षा आपली मुलगी आणि पतीसोबत शाहूनगरमध्ये राहत होती. आज दुपारच्या सुमारास घरामध्ये दोघींना विजेचा जोरात झटका लागला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Pimpri Chinchwad Crime : बनावट शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे कोट्यवधींची फसवणूक; लुबाडणूक करणारी टोळी ताब्यात

रवळगावच्या शाहूनगरमध्ये पोलवरून अनेक दिवसांपासून घरात करंट येत असल्याची तक्रार नागरिकांनी महावितरणला केली होती. वारंवार तक्रार करून देखील महावितरणाने याकडे दुर्लक्ष केले. गेल्या काही दिवसांमध्ये विजेच्या खांबावरून करंट येत अनेकांना विजेचे झटका लागल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी महावितरणाला देखील सांगितले. पण त्यांनी वेळीच लक्ष न दिल्यामुळे आज मायलेकींचा जीव गेल्याचा आरोप शाहूनगरमधील ग्रामस्थांनी केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मायलेकींचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवले आहेत. सेलू पोलिसांनी या घटनेची नोंद घेत महावितरणाला या दोघींना विजेचा झटका नेमका कशामुळे लागला यामागचे कारण तपासण्यास सांगितले आहे. या घटनेमुळे शाहूनगरवर शोककळा पसरली आहे. नागरिकांनी महावितरणाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply