Parbhani Fire News : परभणीत आग्नितांडव: कपड्याच्या कारखान्यात भीषण आग, घरांनाही बसली झळ

Parbhani Fire News : परभणी शहरातील जिंतूर रोडवरील जाधव गारमेंटला आज सकाळच्या सुमारास आग लागली. या आगीने भीषण स्वरुप धारण केल्याने जाधव गारमेंटमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. या घटनेत सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. 

शहरातील जिंतूर रोडवरील खाँजा कॉलनीत प्रशांत जाधव यांच्या जाधव गारमेंटला या कपड्याच्या कारखान्याला आग लागल्याची वार्ता  परभणी शहरात पसरली. त्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली.

Beed Crime News : ३० हजारात बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टरच्या सहकाऱ्यांसह आवळल्या मुसक्या

या आगीने राैद्ररुप धारण केले हाेते. या घटनेत कपडे जळून खाक झाले. या आगीचा फटका नजीकच्या दोन घरांना देखील बसला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

या घटनेत मशीन, कच्चा व तयार माल जळून खाक झाला आहे. सुमारे पन्नास ते पंचावन्न लाख रुपयांचे नुकसान झाले आहे  दरम्यान या आगीची झळ बसलेल्या घरांचे देखील नुकसान झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply