Pankaja Munde Dasara Melava : दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंकडून उमेदवार पाडण्याचा एल्गार; कोण आहेत निशाण्यावर?

Pankaja Munde Dasara Melava : भाजपमध्ये नाराज असलेल्या नेत्या पंकजा मुंडे यांनी यापूर्वी अनेक वेळा भाजपातील नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. मात्र, काल झालेल्या दसरा मेळाव्यात त्यांनी आता मी उमेदवार पाडूही शकते असं म्हणून भाजपलाच आव्हान दिलंय. भाजपतील उमेदवार निवडून आणण्यासाठी राज्यभर फिरणाऱ्या पंकजा मुंडे नेमकं कोणाला पडणार असा प्रश्न राज्यातील राजकारणातील धुरंधरांना पडला आहे.

सावरगाव मध्ये दसरा मेळाव्यासाठी जमलेल्या मुंडे समर्थकांसमोर पंकजा मुंडे पुन्हा कडाडल्या. यापुढे चारित्र्यसंपन्न उमेदवारांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणायचं असं सांगत असतानाच मी राजकारणातली लेची-पेची नाही सांगत दुपारच्या उन्हात हजारो मुंडे समर्थकांसमोर स्वतःचे स्टेज सुद्धा उन्हात लावून पंकजा मुंडे यांनी आता आम्हाला त्रास देणाऱ्यांचे घर उन्हात बांधू असे सांगून कुणाला इशारा दिला, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

Nandurbar : पपईवर मोझ्याक व्हायरसचा प्रादुर्भाव, जिल्ह्यातील तीन हजार हेक्टर क्षेत्र बाधित; शेतकरी पिकावर फिरवतायेत रोटावेटर...

ड्रग्स वरून राज्यात राजकारण सुरू असताना पंकजा मुंडे यांनी मात्र थेट वाढणाऱ्या ड्रग च्या मुळाशी हात घातला आणि गोपीनाथ मुंडे ज्यावेळी गृहमंत्री होते त्यावेळी त्यांनी अंडरवर्ल्डचा कसा नायनाट केला हे सांगून गृहमंत्री असलेल्या  देवेंद्र फडणवीस  यांच्या गृह खात्यासमोरच प्रश्नचिन्ह उभे केला. मी आता 2024 च्या मैदानात उतरणार आहे असे सांगून पंकजा मुंडे यांनी आगामी संघर्ष अधोरेखित केला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यावेळेस पासूनच पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज आहेत या चर्चेला सुरुवात झाली. पंकजा मुंडे यांना पराभूत करण्यात पक्षातील काही मंडळी सक्रिय होती, अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू होती. त्यानंतर ही पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी भाजपकडून तयारी सुरू केली. स्वतः पंकजा यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरून तयार ठेवला होता. मात्र, ऐनवेळी पंकजा यांना डावलले गेले आणि इथून तर त्यांची नाराजी आणखीनच वाढत गेली. तर,  दुसरीकडे मधल्या काळामध्ये अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले हे देखील पंकजा मुंडे यांना खटकलं असावं त्यामुळे त्यांनी राजकीय चरित्रावर भाष्य केलं का असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. 

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी संघर्ष यात्रा काढून राज्यभर भाजप उमेदवाराच्या विजयासाठी सभा घेतल्या. पंकजा मुंडे यांनी या संघर्ष यात्रेचा अनेक वेळा दाखला देत भाजपाच्या विजयामध्ये आपला कसा वाटा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. आता मात्र पंकजा मुंडे मी उमेदवारांना पाडूही शकते असा गर्भित इशारा देत भाजपला आव्हान दिलाय.

भाजपमध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडे काही एकट्या नेत्या नाहीत. मात्र, या नाराजीबद्दल जाहीरपणे बोलणाऱ्या त्या राज्यातील एकमेव नेत्या आहेत. आता येणाऱ्या पुढच्या काळात लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा या सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुद्धा निवडणूक आहेत आणि अशा निवडणुकांच्या काळात पंकजा मुंडे यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी मैदानात उतरायला मी तयार आहे असे सांगून राज्यातील राजकीय संघर्षाचे सुतोवाच केलंय असं म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply