Pankaja Munde : पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज, वारंवार फोनवर त्रास, परळीच्या तरुणाला पुण्यातून अटक

Pune Latest News : मंत्री पंकजा मुंडे यांना वारंवार अश्लील मेसेज पाठवणे, सतत फोन कॉल करून त्रास दिल्याच्या आरोपाखाली पुण्यातून एका तरूणाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातून अटक केलेल्या तरूणाचे नाव अमोल काळे असे आहे. २५ वर्षीय अमोल काळे परळीचा असून तो शिक्षणासाठी पुण्यात आलेला आहे. अमोल काळे याने असं कृत्य करण्यामागचं कारणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. आरोपीला पोलिसांनी आज कोर्टात हजर केले, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी येथून २५ वर्षीय अमोल काळे याला बेड्या ठोकल्या होत्या. भाजपा नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील कॉल आणि मेसेज पाठवल्याच्या आरोपाखाली त्याच्या मुसक्या आवळल्या. पंकजा मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्रासदायक कॉल आणि आक्षेपार्ह मेसेज अमोल काळे याच्याकडून येत होते. याप्रकरणी भाजपाच्या महाराष्ट्र कार्यालयातील सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे (वय २६) यांनी मुंबईतील नरिमन पॉइंट येथे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली.

निखिल भामरे याच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. याचे धागेदोरे पुण्यात असल्याचे समोर आले. सायबर पोलिसांनी आरोपी अमोल काळे याला पुण्यातील भोसरी येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे याने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ७८ आणि ७९ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

२५ वर्षीय अमोल काळे हा बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी आहे. अमोल सध्या पुण्यात राहून शिक्षण घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कॉल आणि मेसेजमध्ये अश्लील भाषा वापरली होती. अमोल काळे याच्या फोनवरील संभाषणामुळे पंकजा मुंडे यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. काळे याने आपला गुन्हा कबूल केला असून, त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ७८ आणि ७९ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनुसार, काळे याच्या या कृत्यामागील हेतू वैयक्तिक रागातून प्रेरित होता की अन्य कोणत्या कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीच्या हेतूंसह इतर कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी करत आहेत.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply