Pandharpur : तिरुपती, अयोध्यानुसार पंढरपुरात टोकन दर्शन सुविधा; कार्तिकीनिमित्ताने ४ नोव्हेंबरपासून चोवीसतास दर्शन

Pandharpur : आषाढी यात्रेनंतर येणाऱ्या प्रमुख पंढरपूर यात्रेतील कार्तिकी एकादशी यंदा १२ नोव्हेंबरला होणार आहे. त्या निमित्ताने ४ ते २० नोव्हेंबर या काळात श्री विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे; अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.  

पंढरपूरला वर्षभर भाविकांची रीघ सुरु असते. मात्र आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. आषाढी व कार्तिकी एकादशीला महत्व देखील तितकेच आहे. त्यानुसार यंदाची कार्तिकी एकादशी १२ नोव्हेम्बरला आहे. या कार्तिकी यात्रेनिमित्ताने येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता चोवीस तास दर्शन सुविधा सुरु करण्यात येत आहे. त्यानुसार ४ नोव्हेंबरपासून हि दर्शन सुविधा सुरु करण्यात येणार आहे. 

Baba Siddique : वाय दर्जाची सुरक्षा, पण तरीही आरोपींनी झाडल्या धडाधड गोळ्या; बाबा सिद्धीकींच्या हत्येचा थरार

कार्तिक एकादशी काळात TCS कंपनी कडून प्रायोगिक तत्त्वावर टोकन दर्शन सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिरुपती, अयोध्या येथील दर्शन धर्तीवर पंढरपूर ही टोकन दर्शन सुविधा सुरू करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. या बरोबरच लवकरच पंढरपुरात अध्यात्मिक रेडिओ वाहिनी सुरू होणार असल्याचं औसेकर महाराज यांनी सांगितले. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply