Pandharpur Temple : विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कायापालट होणार; मंदिर विकास आराखड्याला अंतिम मंजुरी

Pandharpur : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखड्याला राज्य शासनाने तत्वतः मंजुरी दिली आहे.

मंदिर विकास आराखड्याच्या कामाचा शुभारंभ येत्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीमध्ये मंदिर विकास आराखड्याला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 73 कोटी 80 लाख रुपये खर्च करून मंदिराचे मूळ स्वरूप जतन करण्यात येणार आहे. 

विठ्ठल रुख्मिणी मंदिराला मूळ रूप प्राप्त व्हावे यासाठी मंदिर समितीने राज्य सरकारला विकास आराखडा सादर केला होता. त्या विकास आराखड्याला आता राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे सातशे वर्षांपूर्वीचे विठ्ठल मंदिर आता भाविकांना मूळ स्वरूपात पाहायला मिळणार आहे

 

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply