Pandharpur News : शासन आपल्या दारी कार्यक्रम आता गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच; पंढरपुरात मराठा समाजाचा इशारा

पंढरपूर : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटलं आहेत. पंढरपुरात देखील मराठा समाज आक्रमक झाला असून येत्या १० तारखेला आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला तर उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. तसेच गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी देखील केली आहे. 

Jalna Lathi Charge : शैलेश बलकवडे जालन्याचे नवे पोलीस अधीक्षक, लाठीचार्ज प्रकरणी एसपी तुषार दोषींना पाठवले सक्तीच्या रजेवर

रास्ता रोको आंदोलन 
जालना येथील घटनेचे पडसाद आज पंढरपुरात उमटले. यात पंढरपूर तालुक्यातील भोसे या ठिकाणी टेंभुर्णी, नगर, पुणे रस्ता अडवून सकल मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने गाई गुरांसह महिला आणि पुरुष येऊन शासन आपल्या दारी कार्यक्रम उधळून लावू. असा इशारा यावेळी मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. त्यामुळे पंढरपूरच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर आता संकट येऊन ठेपले असल्याची चिन्हे आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply