Pandharpur Corridor: पंढरपूर काॅरीडाॅरच्या आराखड्याचे काम सुरू, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

 

Pandharpur Corridor : काशी विश्वनाथ सारखा पंढरपुराचा ही चौफेर विकास झाला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघे ही आग्रही आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरचा मोठा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सुधीर मुनगंटीवार शनिवारी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. विठ्ठल दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना पंढरपूरच्या काॅरीडाॅर संदर्भात मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर मागील काही महिन्यांपासून प्रलंबीत असलेल्या काॅरीडाॅर प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Kalyan News : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ; आणखी एका प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पंढरपूर हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे दररोज हजारो तर आषाढी -कार्तिकीसाठी लाखो भाविक विठ्ठल दर्शनासाठी येतात. येणाऱ्या भाविकांना विठुरायाचे दर्शन सुलभ व्हावे, शिवाय मंदिर परिसरातील गर्दी कमी व्हावी, यासाठी राज्य सरकारने मंदिर परिसरात काॅरीडाॅर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

काॅरीडाॅर सर्वेक्षणाच्या कामासाठी टेंडर ही काढले आहे. तथापी मंदिर परिसरातील काही व्यापारी आणि नागरिकांनी काॅरिडाॅरला विरोध केला आहे. त्यांच्या विरोधामुळे मागील काही महिन्यांपासून काॅरिडाॅरचे काम ठप्प झाले आहे. दरम्यान राज्यात पुन्हा भाजप- शिवसेना-राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर कॉरिडॉर करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत.

त्यातच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंढरपूरचा मोठा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितल्याने विठ्ठल मंदिर परिसरात काॅरिडाॅर करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply