Pandharpur Accident : पंढरपुरात पिकअपचा भीषण अपघात, २२ भाविक गंभीर जखमी

Pandharpur Accident : विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या  भाविकांच्या पिकअप वाहनाला  अपघात  झाला. या अपघातामध्ये २२ जण जखमी झाले आहेत. अपघाताची घटना पंढरपूर सोलापूर मार्गावरील पंढरपूर जवळच्या तुंगत परिसरात घडली. 

हाती आलेल्या माहितीनुसार, चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. अपघातात जखमी झालेले भाविक हे परभणी जिल्ह्यातील पालम येथील आहेत. हे भाविक खासगी पिकअप वाहनाने पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते. ते वाहन पंढरपूर जवळ असतानाच वाहनाला अपघात झाला. जखमींना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Weather Update : राज्यातील 'या' भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज?

एसटी बस आणि मालवाहू वाहनाची धडक

बुलढाण्यातील लाखनवाडा ते उदयनगर रस्त्यावर एसटी बस आणि मालवाहू वाहनाची जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले. बुलढाण्यातील लाखनवाडा ते उदयनगर दरम्यान रस्त्यावर असलेल्या पिंप्री कोरडे गावाजवळ अपघाताची घटना घडली.

पिंपरी कोरडे गावाजवल विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाने एसटी बसला धडक दिली. दरम्यान अपघातग्रस्त झालेल्या बसमध्ये एकूण ४७ प्रवाशी प्रवास करत होते. दोन्ही वाहनाचे चालक गंभीर जखमी झालेत. तसेच बस मधील शाळकरी विद्यार्थ्यांसह काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले.

जळगावात उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक

रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना जळगावात घडली. अमळनेर तालुक्यातील गांधली रस्त्यावर सप्तशृंगी मंदिराजवळ अपघाताची घटना घडली.

अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथील युवराज दयाराम पाटील (वय ६२) हे पत्नी मंगलबाई युवराज पाटील (वय ५५) हे दुचाकीने पारोळा येथे गेले होते. सायंकाळी गावाकडे परत येत असताना सप्तशृंगी मंदिराजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला त्यांची दुचाकी धडकली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply