
Pandharpur : पंढरपूरमध्ये आषाढी, कार्तिकीसह चार मोठ्या यात्रा भरत असतात. या यात्रेनिमित्ताने भाविकांची मोठी गर्दी पंढरपूरमध्ये दाखल होत असते. प्रामुख्याने आषाढीला १५ ते १६ लाख भाविक पंढरपूरला दर्शनासाठी येत असतात. यामध्ये प्रामुख्याने विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंटात लाखो भाविकांची गर्दी असते. या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आता एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजन आपत्ती व्यवस्थापन समितीकडून करण्यात येत आहे.
पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षाकाठी एक कोटी भाविक येत असतात. तर पंढरपूरची सर्वात मोठी यात्रा असलेल्या आषाढी वरील मानाच्या पालख्यांसह अनेक दिंड्या पायी पंढरपूरला येत असतात. दशमी आणि एकादशीच्या दिवशी मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग आणि चंद्रभागा वाळवंटामध्ये लाखो भाविक असतात. भाविकांना सुरक्षित दर्शन मिळावे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी यात्रेच्या तीन महिने अगोदरच प्रशासनाच्या वतीने तयारी केली जाते. त्यानुसार कार्तिकी यात्रेला देखील गर्दी जमत असते.
सुरक्षित गर्दी व्यवस्थापन प्रत्येक वर्षी होणाऱ्या सोहळ्यासाठी आता एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या माध्यमातून सुरक्षित गर्दी व्यवस्थापन ही संकल्पना राबवली जाणार आहे. यासाठी चालणारी गर्दी, बसलेली गर्दी आणि उभे राहिलेली गर्दी याचे नियोजन केले जाणार आहे. सध्या यात्रा काळामध्ये वेगवेगळ्या विभागामार्फत गर्दीचे व्यवस्थापन केले जाते. आता मात्र एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व विभागांचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे.
शासनाकडे दोन कोटींचा प्रस्ताव
एआय तंत्रज्ञानामार्फत सॅटॅलाइट, इंटरनेट, जीपीएस सिस्टीम, व्हिडिओ शूटिंग, सीसीटीव्ही आणि मानवी व्यवस्थापन सर्व एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकत्र केले जाणार आहे. हे एआय तंत्रज्ञान तयार करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून शासनाकडे दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण आराखडा तयार केला जाणार आहे. याचा पुढील शेकडो वर्ष यात्रा व्यवस्थापनासाठी फायदा होणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
- सेंट्रल बँकेत २५० हून अधिक स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती: १.२० लाखांपर्यंत पगार, आजच अर्ज करा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- उन्हाळ्याची खास थंडाई: घरीच बनवा पौष्टिक आणि रुचकर केशर बदाम सरबत, सोपी कृती


























Subscribe to my channel


