Pandharpur : स्वातंत्र्यदिनी पंढरीतही उत्साह; आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई, फुलांच्या सजावटीने उजळला मंदिर परिसर

Pandharpur : एकीकडे देशात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना पंढरीचा विठुराया देखील देशप्रेमात न्हाहून निघाला आहे. मंदिराला तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई तसंच फुलांची आरास करण्यात आली आहे. यात सावळ्या विठुरायाचे राजस सुकुमार रूप अधिकच खुलून दिसत आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मंदिरावर, दर्शन मंडप, भक्त निवास येथे विद्युत रोषणाई केली आहे.तसेच मंदिरात देखील आकर्षक फुलांनी सजवले आहे.

CMEknath Shinde Independence Day: मागच्या सरकारमध्ये महाराष्ट्राची घसरण; आम्ही राज्याला प्रगतीपथावर नेले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्वातंत्र्यदिनी प्रतिपादन

मंदिरातील प्रवेशद्वार, सोळखांबी, मंदिरा बाहेर अशा ठिकाणी तीन रंगांच्या फुलांची आरास करण्यात आली आहे. सलग सुट्टी व श्रावण महिना असल्याने भाविकांची गर्दी झाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *