Palghar Earthquake : पालघरच्या डहाणू परिसरात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Palghar Earthquake : पालघरच्या डहाणू परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता २.२ रिक्टर स्केल असल्याची नोंद करण्यात आलीय. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु कुठल्याच प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये.

भूकंपाचे धक्के रात्री ८.०४ मिनिटांच्या सुमारास जाणवले. दरम्यान पनवेल तालुक्यासह कामोठे शहरातही आज सकाळी भूकंपाचे सौम्य हादरे बसले. यावेळी अनेक इमारतींनाही धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के बसल्यानंतर नागरिकांच्या घरातील वस्तू हालू लागल्या होत्या. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Unseasonal Rain Hits Buldhana : वीज काेसळून शेगाव, खामगाव तालुक्यातील ३० मेंढ्यांचा मृत्यू

हादरे जाणवल्यापूर्वी एक मोठा आवाज झाला आणि काही सेकंदासाठी कंप जाणवला. दरम्यान या घटनेला पनवेल तहसीलदार विजय पाटील आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दुजोरा दिलाय. गेल्या तीन चार दिवसापूर्वी देखील पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply